UNIFIED LANDING INTERFACE: नमस्कार मित्रांनो, गृहकर्ज असो की पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे कागदपत्रे द्यावी लागतात. अनेक दिवस बँकांच्या चकरा माराव्या लागतात. परंतु आता या सर्व प्रक्रियेतून सुटका मिळणार आहे. कर्ज घेणे सोपे होणार आहे. अगदी युपीआय पेमेंट करण्यासारखा हा प्रकार होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन प्रणाली आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. युनिफाइड लँडिंग इंटरफेस (ULI) असा नवीन प्लॅटफॉर्म त्यासाठी आणला गेला आहे.
आरबीआयने मागील वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये फ्रिक्शनलेस क्रेडिट सहज कर्ज देण्यासाठी टेक्निकल प्लॅटफॉर्मचा पायलट प्रोजेक्ट लॉन्च केला होता. आरबीआयने वर्षभरात ULI या पायलट प्रोजेक्ट दरम्यान किसान क्रेडीट कार्ड (KCC) लोन, डेअरी लोन, एमएसएमई लोन, पर्सनल लोन आणि होम लोन देण्यावर अधिक फोकस केले आहे.
कसा होणार फायदा- UNIFIED LANDING INTERFACE
सध्या त्वरीत कर्ज देणारे काही अॅप आहेत. परंतु त्यावर आरबीआयचे नियंत्रण नाही. त्यामुळे त्यावर अनेकवेळा नियम डावलून काम होते. त्याचा फटका कर्ज घेणाऱ्यांना बसतो. परंतु युएलआय या अॅपवर थेट आरबीआयचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे त्यावर गोंधळ होण्याचा धोका नसणार आहे. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना कुठे कमी व्याजदर आहे, ते सुद्धा कळणार आहे. ग्रामीण भागातील लोक आणि छोट्या उद्योजकांना त्याचा फायदा होणार आहे. ULI अॅपमुळे कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया सुलभ होईल. कर्जाच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि कागदी कामे कमी होतील.
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
फक्त पिन टाकून मिळणार कर्ज- UNIFIED LANDING INTERFACE
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा आधार, ई-केवायसी, जमिनीच्या नोंदी, पॅन प्रमाणीकरण आणि अकाउंट एग्रीगेटरसह विविध स्त्रोतांकडून ULI अॅप डेटा संकलित करेल. तसेच दुग्ध सहकारी संस्थांकडील दुधाचा डेटा यासारख्या सेवांशी देखील जोडले जाईल. ज्याप्रमाणे तुम्ही फक्त तुमचा पिन टाकून UPI मध्ये पेमेंट करता, त्याच प्रकारे तुम्ही पात्र असल्यास, तुमचा पिन टाकून तुम्ही कर्ज घेऊ शकता.
UPI अॅप एप्रिल 2016 मध्ये लाँच करण्यात आला. 8 वर्षांच्या प्रवासात UPI ने डिजिटल पेमेंटचे जग बदलून टाकले आहे. पानाच्या दुकानांपासून ते भाजीच्या स्टॉलपर्यंत, तुम्हाला QR कोड स्कॅनर बसवलेले दिसतील. भारताबाहेरसुद्धा देशांनीही UPI मॉडेल स्वीकारले आहे.
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!
SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी 10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला!