क्रिकेट चाहत्यांना डब्ल्यूसीएल स्पर्धेतील अंतिम सामन्यात हायव्होल्टेज थरार पाहायला मिळणार आहे. इंडिया-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत.
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 स्पर्धेतील अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध इंडिया चॅम्पियन्स आमनेसामने आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. याआधी साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने होते. तेव्हा पाकिस्तानने इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे आता इंडियाला अंतिम फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून ट्रॉफी जिंकण्यासह मागील पराभवाचा वचपा घेण्याची दुहेरी संधी आहे. युवराज सिंह याच्याकडे इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. तर युनिस खान पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. या महामुकाबल्याला किती वाजता सुरुवात होणार? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामना केव्हा?
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामना आज 13 जुलै रोजी होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामना कुठे?
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामना एजबेस्टन, बर्मिंघम येथे होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामन्याला रात्री 9 वाजता सुरुवात होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
पाकिस्तान विरुद्ध इंडिया सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान-इंडियाचे दिग्गज आमनेसामने
पाकिस्तान चॅम्पियन्स : यूनुस खान (कॅप्टन), मिस्बाह उल हक, शाहिद अफ्रिदी, कामरान अकमल, अब्दुल रझ्झाक, वाहेब रियाझ, सईद अजमल, सोहेल तन्वीर, सोहेल खान, तन्वीर अहमद, मुहम्मद हफीझ , आमीर खान, शोएब मलिक, शोएब मकसूद, शार्जिल खान आणि उमर खान.
इंडिया चॅम्पियन्स टीम: युवराज सिंह (कॅप्टन), हरभजन सिंह, सुरेश रैना, इरफान पठान, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, यूसुफ पठान, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंह, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अनुरीत सिंह आणि पवन नेगी.