CM Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाईन फॉर्म भरण्याची एकदम सोपी पद्धत वापरता येईल. खाली आपण जाणून घेऊया ही प्रक्रिया.
महायुती सरकारने अलीकडेच सादर केलेल्या अर्थसंकल्पात नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म (mukhyamantri mazi ladki bahin yojana) भरण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये महिलांची प्रचंड झुंबड उडाली आहे. प्रचंड गर्दीमुळे अनेक ठिकाणी महिलांना या योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. मात्र, महिलांना हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा भरता येईल. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पीडीएफ फाईल डाऊनलोड करावी लागेल आणि तुम्हाला त्यावर नाव, पत्ता आणि इतर सगळे तपशील भरावे लागतील. त्यानंतर हा भरलेला फॉर्म पुन्हा अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करुन, त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म असा भरा- CM Ladki Bahin Yojna
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज देण्यात आला त्यावर इतर सरकारी कामांसाठी आपण ज्याप्रकारे वैयक्तिक तपशील भरतो, त्याच पद्धतिने येथेही भरायचा आहे. या फॉर्ममध्ये महिलांना आधी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिनकोड इत्यादी माहिती भरावी लागेल. याशिवाय, तुमच्या बँक खात्या सोबत जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही न विसरता अर्जात नमूद करावा. याशिवाय, महिलांना वैवाहिक स्थिती ची माहिती देणेही अर्जात आवश्यक आहे.
याशिवाय, या अर्जात तुम्ही अगोदर पासून कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का? असा प्रश्न सुद्धा विचारण्यात आला आहे. एखादी महिला सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तिला संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात, हे अर्जात नमूद करावे लागेल.
यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहेत, त्याचा संपुर्ण तपशील भरावा लागेल. यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संबंधित बँकेचा IFSC Code हे सर्व तपशील अचूक भरावे लागतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे गरजेचे आहे. त्याचा तपशीलही सुद्धा अर्जात नमूद करावा लागेल. सगळ्या शेवटी अर्ज भरणारी महिला कोणत्या वर्गात मोडते, हे नमूद करावे लागेल. अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकर नसेल तर त्या पर्यायासमोर खुण करावी.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेसाठी खालील महिला पात्र असतील- CM Ladki Bahin Yojna
♦महाराष्ट्र रहिवासी
♦विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
♦लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
♦60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
🔴या योजनेसाठी खालील महिला अपात्र असतील
♦2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
♦घरात कोणी Tax भरत असेल तर
♦कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
♦कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
♦कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे- CM Ladki Bahin Yojna
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्रामधुन ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया नमूद केलेली आहे.
ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुद्धा सुविधा मिळेल.
पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
इंडियन बैंक मध्ये नवीन 102 जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!
Land Record: फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर
उत्तर पूर्व रेल्वे मध्ये नवीन 1104 जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!