Maharashtra Shikshak Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन 2025 अंतर्गत रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025” मधील प्राप्त गुणांच्या आधारे इयत्ता 1 ली ते 12 वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. पवित्र पोर्टलवर एकूण 30,209 रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक 06/08/2026 ते 11/08/2026 या मुदतीत तो लॉक करणे आवश्यक आहे. उमेदवारांसाठी लॉगिन, प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेची अधिकृत माहिती खाली दिली आहे. महत्त्वाची सूचना – प्राधान्यक्रम नोंद करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत प्रेस नोट सुरुवातीपासून लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
✍ पदाचे नाव: शिक्षण सेवक/शिक्षक
💁♂️ पदसंख्या: एकूण 30,209
📚 शैक्षणिक पात्रता: जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेचा तपशील नमूद केलेला नाही.
💁♂️ वयोमर्यादा: जाहिरातीमध्ये वयोमर्यादेचा तपशील नमूद केलेला नाही.
💵 वेतनश्रेणी: जाहिरातीमध्ये वेतनश्रेणीचा तपशील नमूद केलेला नाही.
💰 अर्ज शुल्क: जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काचा तपशील नमूद केलेला नाही.
✈ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा
📝 अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम/पदनिहाय पसंतीक्रम नोंद करणे
📅 प्राधान्यक्रम लॉक करण्याची शेवटची तारीख: 11/08/2026
📅 प्राधान्यक्रम नोंद करण्याची सुरुवात: 06/08/2026
🔢 एकूण रिक्त पदे: 30,209
➡️ जिल्हा परिषद: 13,351
➡️ नगर पालिका/परिषदा: 280
➡️ महानगरपालिका: 1,954
➡️ आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा: 2,421
➡️ शासकीय विद्यानिकेतन: 56
➡️ खाजगी शैक्षणिक संस्था: 12,148
📚 पदनिहाय रिक्त पदे:
➡️ इयत्ता 1 ली ते 5 वी: 14,320
➡️ इयत्ता 6 वी ते 8 वी: 10,012
➡️ इयत्ता 9 वी ते 10 वी: 5,513
➡️ इयत्ता 11 वी ते 12 वी: 364
➡️ एकूण: 30,209
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज |
अर्ज करण्याची पद्धत-
वरील पदांकरीता उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर लॉगिन करून प्राधान्यक्रम जनरेट करायचा आहे. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक 06/08/2026 रोजी देण्यात आली आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक 06/08/2026 ते 11/08/2026 या मुदतीत तो लॉक करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येईल.
पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे/मागणी इत्यादी बाबी edupavitra25@gmail.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया वरील अधिकृत प्रेस नोट काळजीपूर्वक वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.





